Wednesday, September 2, 2026
HomeनगरMaharashtra Weather : जिल्ह्यात १८, १९ मार्चला यलो अलर्ट; अवकाळीच्या भितीने गहू,...

Maharashtra Weather : जिल्ह्यात १८, १९ मार्चला यलो अलर्ट; अवकाळीच्या भितीने गहू, हरभरा आणि ज्वारीच्या काढणी कामाला वेग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, १८, १९ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील काढणीस आलेला गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके वाचविण्याच्या कामाला लागला आहे.

राज्यात उन्हाच्या कहिलीपासून नागरिकांना थोडाचा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यात विषेशतः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

पुढील दिवसांचा हवामान अंदाज

  • १७ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट : सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
  • १८ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट : रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सांगली, हिंगोली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
  • १९ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट : रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.

ताज्या बातम्या

Nashik News : राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – विजय...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जादायी आणि...