Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजWinter Session 2025: आएएस अधिकारी तुकाराम मुंडे भाजपच्या रडारवर; थेट निलंबित करण्यासाठी...

Winter Session 2025: आएएस अधिकारी तुकाराम मुंडे भाजपच्या रडारवर; थेट निलंबित करण्यासाठी विधिमंडळात मागणी करणार, नेमका विषय काय?

नागपूर | Nagpur
राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यातच धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण, या अधिवेशनात तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मागणी भाजप आमदारांकडून करण्यात येणार असल्याचे समोर आलेय.

भाजप आमदार कृष्णा खोपडे विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प”चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप आमदारांकडून आजच्या अधिवेशनात तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना शासनाकडून कोणतीही नियुक्ती नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद स्वतःकडे घेतल्याचा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप आहे. अधिकृत अधिकारांशिवाय प्रकल्पाचा ताबा घेतल्याने मोठा अनियमिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचा नेमका आरोप काय?
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. तसेच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई होऊ शकली नव्हती. आता ते दोन्ही जुने प्रकरण नव्याने पुन्हा समोर आणून भाजप आमदार तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

तुकाराम मुंडे बदल्यांमुळे चर्चेत
तुकाराम मुंडे यांची सतत होत असलेल्या बदलीमुळे ते चर्चेत असतात. सरासरी एक वर्ष एकाच ठिकाणी त्यांची नियुक्ती होते. तुकाराम मुंढे हे २००५ बॅचचे अधिकारी असून गेल्या २० वर्षांच्या कालावधीत त्यांची ही २४ बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची ऑगस्ट २०२५ मध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

“जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या…”; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

0
मुंबई । Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस उजाडला असतानाच, आता आंदोलनकर्ते आणि सरकारमधील राजकीय संघर्ष...