Tuesday, September 8, 2026
Homeनगरमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 18 वाण देश पातळीवर प्रसारीत

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 18 वाण देश पातळीवर प्रसारीत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेल्या विविध पिकांच्या 18 वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचीत करण्यात आली आहेत. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांपैकी या कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त वाण प्रसारीत झाले आहेत.

- Advertisement -

अधिसुचनेमध्ये प्रसारीत केलेली पिके व त्यांचे वाण पुढीलप्रमाणे भात-फुले कोलम, मका-फुले उमेद व फुले चॅम्पियन, ज्वारी-फुले पुर्वा, करडई-फुले भूमी, तूर-फुले पल्लवी, मूग-फुले सुवर्ण, उडीद-फुले राजन, राजमा-फुले विराज, ऊस-फुले 15012, घेवडा-फुले श्रावणी, गहु-फुले अनुराग, कापूस-फुले शुभ्रा, टोमॅटो-फुले केसरी, चेरी टोमॅटो-फुले जयश्री, घोसाळे-फुले कोमल, वाल-फुले सुवर्ण व मेथी-फुले कस्तुरी.

केंद्राने अधिसुचीत केलेल्या यादीमध्ये सदरच्या वाणांचा समावेश झाल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनाची दखल देश पातळीवर घेण्यात आली आहे. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

सन 2024 या वर्षी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सर्वात जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत झाले आहेत. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्यादृष्टीने ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रामाणिकपणे काम करत असून शेतकरीभिमुख संशोधन करीत आहेत.
– डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, मफुकृवि, राहुरी

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संलग्न जिल्ह्यांशी समन्वय आवश्यक – विभागीय आयुक्त डॉ....

0
नाशिक, दि. 8 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा): Nashik नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यांच्या नियोजनासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांचाही सहभाग महत्वाचा...