Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच विजयी होणार -...

Nashik News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच विजयी होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची बूथ प्रमुख कार्यशाळा व प्रमुख पदाधिकारी बैठक आज सातपूर मधील हॉटेल डेमोक्रेसी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवाच फडकणार असा विश्वास व्यक्त करून विरोधकांच्या चारी मुंड्या चीत करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भाषणाच्या सुरवातीस सध्या पूरग्रस्तांची परिस्थिती खूप गंभीर असून त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. पूरग्रस्तांना केंद्र व राज्य सरकारतर्फे भरघोस अशी मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज पुन्हा दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना शिंदे म्हणाले की, या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने मतदार यादीवर सुरुवातीला काम केले पाहिजे. आमदार व खासदारांना कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकून दिल्या आहेत. आता कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकू देण्याची जबाबदारी सर्व आमदार, खासदार, मंत्री यांची आहे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करूच पण तुम्ही सुद्धा मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा. आपल्या हक्काचे मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. सर्वांनी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची ही खरी वेळ आहे. गणित जिंकायचे करायचे आहे. मतदार यादीत तुम्हाला जिंकून देईल. विरोधक भरपूर चर्चा करतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका त्याची काळजी करू नका. मुख्यमंत्री व आम्ही दोघे उपमुख्यमंत्री मिळून कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आगामी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात करोडो लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करायचा आहे. त्याकरिता कुठल्याही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केले आहे. तर नाशिकच्या नुकसानग्रस्त कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी शिंदे यांनी सांगितले.

नाशिकच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना नाशिक खड्डे मुक्त करण्याचे आदेशित केले आहे.खड्डे मुक्त नाशिक ही भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नाशकात असलेल्या सिडको फ्री होल्ड आम्ही लवकरच करणार आहोत. महापालिकेच्या लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या ज्या ज्या मालमत्ता बंद अवस्थेत पडलेल्या आहेत त्या नाममात्र दरात सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्तांची चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विविध योजना आजपर्यंत महायुती सरकारने आणल्या आहेत.असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी आ.नरेंद्र दराडे,आ. किशोर दराडे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, विलास शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे, सुवर्णा मटाले, माजी आ. काशिनाथ मेंगाळ, आविष्कार भुसे, योगेश नरवडे, अनिल ढिकले, राजु लवटे, शिवाजी भोर, शरद देवरे, भाऊलाल तांबडे, विजय करंजकर, गणेश कदम आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडकी सुन कक्ष स्थापन
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या पक्षाने लाडकी सून कक्षाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून जिथे जिथे कुठल्या सुनेवर अन्याय होईल तिथे जाऊन आपले कार्यकर्ते तात्काळ मदत करतील. जेणेकरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना मदत
नाशिक जिल्हा शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांना मदतीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सीमा निगळ यांनी १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश यावेळी दिला. दरम्यान ,यावेळी उबाठा, काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प . ) आदी पक्षाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वागत केले.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...