Friday, October 2, 2026
Homeदेश विदेशव्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! ३२ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली, १५ भारतीयांचा...

व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! ३२ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली, १५ भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
व्हिएतनाममधून भारतासंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांच्या बोटचा मोठा अपघात घडला आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘फू क्वोक आयलंड’ (Phu Quoc Island) जवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक पर्यटक बोट समुद्रात उलटली आहे. या दुर्घटनेची माहिती व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरून दिली. या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली असून आत्ता पर्यंत या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार बोटीत अनेक भारतीय पर्यटक प्रवास करत होते. बोट बुडाल्यानंतर त्यातील पर्यटकांनी मदतीसाठी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तसेच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बोटीमधून एकूण ३६ लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २१ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

बोट बुडाल्यानंतर त्यातील पर्यटकांनी मदतीसाठी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तसेच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत आणि आवश्यक माहिती मिळावी यासाठी हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात (Consulate General of India) विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

Supriya Sule : आता ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करू…; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

कुटुंबीयांना मदतीसाठी खालील हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. +84 36 281 7930, +84 91 552 37 14, +84 33 452 0414. याशिवाय हनोई येथील भारतीय दूतावासातही स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्यासाठी +84 91 308 9165 हा संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे.

व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय दुतावासाने लिहिले की, व्हिएतनामच्या फू क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी झालेल्या अत्यंत दु:खद दुर्घटनेत भारतीय पर्यटकांना घेऊन जात असलेली एक नाव बुडाली. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे.

ताज्या बातम्या

Accident News : अज्ञात वाहनाची बुलेटला धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार

0
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या...