Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात रमी खेळण्यासाठी स्वतंत्र धोरण आखा! - अंबादास दानवेंची उपहासात्मक टीका

राज्यात रमी खेळण्यासाठी स्वतंत्र धोरण आखा! – अंबादास दानवेंची उपहासात्मक टीका

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात जुगाराचा सुळसुळाट सुरु असून सरकारच त्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रमी खेळण्यासाठी स्वतंत्र धोरण आखावे आणि राज्यातील जनतेने रमी खेळावे यासाठी अध्यादेश काढावा, अशी उपहासात्मक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली.

पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्षाने कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना कोकाटेंवर निशाणा साधला.

माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत होते की नव्हते हे झुम करून पाहिले तर कळेल की ते कोणते पत्ते खेळत होते. विधानसभा आणि विधान परिषद सभागृह लोकशाहीचे मंदीर आहे. तेथे रमी खेळणे हे अपवित्र काम कृषिमंत्र्यांनी केले आहे. राज्याचा कृषिमंत्रीच एवढा असंवेदनशील असेल तर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल दानवे यांनी केला.

ताज्या बातम्या

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर...