Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगावकरांना ‘या’ दहा ठिकाणीच मिळणार जीवनावश्यक वस्तू

मालेगावकरांना ‘या’ दहा ठिकाणीच मिळणार जीवनावश्यक वस्तू

मालेगाव | कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेसह महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यादरम्यान नागरिकांसाठी जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शहरातील दहा स्थळे निश्चित करण्यात आली असून त्यावर नियंत्रण व नियमन करण्यासाठी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश महापालिका उपआयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.

निहाल नगर, कल्लू कुट्टी मैदान, सलीम नगर, अहले हादिस इदगाह, 60 फुटी रोड, अब्बास नगर चौक, गांधी नगर, गुलशेर नगर डेपो, जमहुर नगर, अजीज कल्लू स्टेडीयम अशी शहरातील दहा ठिकाण ही घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांना जिवनावश्यक वस्तू विक्रीसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

तसेच दैनंदिन फळांच्या आवकाची आकडेवारी घेणे, या ठिकाणांवर फिजीकल डिस्टन्सींगची अंमलबजावणी होणे, दररोज वितरीत होणारा माल तसेच किरकोळ व्यापारी व हातगाडी चालक यांची संख्या घेवून अहवाल सादर करणे व एकंदरित संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण व नियमण करण्यासाठी दहा अधिकारी व कर्मचारी यांची देखील नियुक्ती या ठिकाणी करण्यात आल्याचे कापडणीस यांनी सांगितले.

ही सुविधा नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करत सायंकाळी 05:00 वाजेनंतर कुठल्याही विक्रेत्याने आपली दुकाने, हातगाडी सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही कापडणीस यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या