Saturday, August 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon MC Election Result : मालेगावमध्ये 'हे' उमेदवार आघाडीवर; इस्लाम पार्टी किंगमेकर...

Malegaon MC Election Result : मालेगावमध्ये ‘हे’ उमेदवार आघाडीवर; इस्लाम पार्टी किंगमेकर ठरणार?

मालेगाव | Malegaon |

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत २१ प्रभागांतील ८३ जागांसाठी मनपा स्थापनेनंतर प्रथमच ६४ टके विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. ५ लाख १७ हजार ६६३ पैकी ३ लाख २९ हजार ३५८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत ३०९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद केले. त्यानंतर आता मालेगावमधील पहिला कल हाती आला आहे.

- Advertisement -

मालेगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुनील गायकवाड यांच्यासह भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर असून, प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर असून,प्रभाग क्रमांक चार व आठ मध्ये इस्लाम पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, मालेगावात शिवसेना चार, भाजप चार, इस्लाम पार्टी पाच, एमआयएम तीन आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. तसेच प्रभाग क्रमांक १८ मध्ये एमआयएमचे उमेदवार अल्कमा अब्दुल करीम, शेख सिकंदर पहिलवान आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक २० मधून इस्लाम पार्टीच्या मेहमूदाबानो आघाडीवर आहेत. तर एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष खालिद परवेज यांना धक्का बसला असून, त्यांच्याविरुद्ध इस्लाम पार्टीचे मुशर्रफ रांगडी यांनी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...