Sunday, November 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMallikarjun Kharge on Modi : भाजपाच दहशतवाद्यांचा पक्ष…; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे...

Mallikarjun Kharge on Modi : भाजपाच दहशतवाद्यांचा पक्ष…; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा भाजपवर निशाणा, मोदींवर ही बरसले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस शहरी नक्षलवादी पक्ष चालवत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीं होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्युत्तरात खरगे यांनी भाजपला दहशतवाद्यांचा पक्ष म्हटले. त्याचबरोबर मल्लिकार्जून खरगे यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले.

काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?
मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “जे बुद्धीवादी आहेत, त्यांना अर्बन नक्षल म्हणत आहेत. काँग्रेसला म्हणत आहेत. ही त्यांची सवय आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष दहशतवाद्यांचा पक्ष आहे. लिंचिंग करतात, मारतात. अनुसूचित जातीच्या लोकांच्या तोंडात लघवी करतात. आदिवासींना आणून त्यांच्यावर बलात्कार करतात. दहशतवादी पक्ष तर त्यांचा आहे”, असा पलटवार खरगेंनी मोदींच्या टीकेला उत्तर देताना केला.

- Advertisement -

पुढे खरगे म्हणाले, “जे लोक हे सगळे (अत्याचार) करतात, त्यांना हे लोक (भाजप) पाठिंबा देतात. वरून दुसऱ्यांना बोलतात. मोदींना तर अधिकारच नाही. त्यांची सरकारे जिथे-जिथे आहेत. तिथे मागास लोकांवर अत्याचार होतात. विशेषतः आदिवासींवर अत्याचार होतात. वरून ही गोष्टी तेच बोलतात की, बघा तुमच्यावर (आदिवासींवर) हल्ले होतायेत. सरकार आमचे आहे का? तुमचे सरकार आहे, तुम्ही नियंत्रित करू शकता. पण, मोदींची सवय आहे, असेच बोलतात”, अशा शब्दात खरगेंनी मोदींकडून केलेल्या जाणाऱ्या अर्बन नक्षल टीकेला उत्तर दिले.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
महाराष्ट्रात एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवाद्यांची संपूर्ण टोळी… जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त होती. पण त्यांचे सर्व कट उद्ध्वस्त झाले. त्याने दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. पण दलित समाजाला त्याचे घातक हेतू कळले. हरियाणातील दलित वर्गाने भाजपला विक्रमी पाठिंबा दिला.”

मोदी म्हणाले होते की, ”शेतकरी आणि तरुणांना भडकवण्यात त्यांनी कोणतीही सर सोडली नाही. मात्र हरियाणाच्या जनतेने दाखवून दिले आहे की ते यापुढे काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांच्या द्वेषपूर्ण कारस्थानाला बळी पडणार नाहीत.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या