पंजाब । Panjab
पंजाबमधून (Panjab) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर हल्ला झाला आहे.
अमृतसरमध्ये बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी सुखबिरसिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने एक मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत. त्याचवेळी हल्लेखोर तिथे आला आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली.
हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं तर, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचे मानले जाते.