Friday, October 23, 2026
Homeक्राईमNashik News: पार्किंगच्या जागेत झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन गाडी गेल्याने जागीच मृत्यू

Nashik News: पार्किंगच्या जागेत झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन गाडी गेल्याने जागीच मृत्यू

नविन नाशिक | प्रतिनिधी
नविन नाशिक परिसरातील उत्तमनगर भागात असलेल्या शॉपिंग सेंटर येथे रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. पंडित नगर मार्केट येथे पार्किंगच्या जागेत रात्री दहा वाजेच्या सुमारास झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन चारचाकी गाडी गेल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.ऐन दिवाळीत ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत व्यक्तीचे नाव अर्जून तुळशीराम महाजन (वय४२) असे असून तो परिसरातील असल्याचे समजते. या अपघाताप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...