मनोहर कांडेकर
चाळीसगाव । प्रतिनिधी
हिन्दु-मुस्लीमांसह सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पेथील बामोशी उर्फ पीर मुसा कादरी बाबांच्या उर्सला मंगळवार 14 जानेवारी पासून सुरुवात झाली असून आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून पूज्य तलवार मातेची मिरवणूक निघणार आहे. त्याआधिच दै.देशदूततर्फे भाविकांना पूज्य तलवार मातेच्या मिरणूकीचे या फोटोंच्या माध्यामातून दर्शन घडवून देत आहोत.
पूज्य तलवार मिरणूकीची पूजाअर्चा देशमुख घरण्यातील भालचंद्र देशमुख व त्यांच्या सोबत देशमुख घण्यातील तरुणांनी केली आहे. तर संकाळपासून पूज्य तलवार मातेचे दर्शन घेण्यासाठी हिन्दु-मुस्लीमसह सर्व धर्मियांची गर्दी चाळीसगावात दिसून येत आहे.

गुरुवारी संकाळी पूज्य तलवार मातेचे विधिवत पध्दतीने पूजा अर्चा करण्यात आली. पूजेनतंर संकाळपासून शहरातील जुन्या नगरपालीकेच्या कार्यालयाजवळील देशमुखवाडयातील तलवार भवन येथे तलवार मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली दिसून आली. तर रस्त्यावर ठिकठिकाणी हिन्दु-मुस्लीम बांधवाकडून सरबत वाटप करण्यात येत होते.
सायंकाळी पुन्हा तलवार मातेची पूजा अर्चा करुन मिरवणूक निघणार आहे. यंदा तलवार धरण्याचा मान मोहीत सुनिल देशमुख या तरुणास मिळाला आहे. तलवार मिरवणूक सायंकाळी 6 वाजता जुनी नगरपालीका समोरील तलवार भवन येथून मालच्द्र देशमुख यांच्या घरापासून वाद्यांच्या गजरात निघेल. ही मिरणूक सदर बाजार, कै.अनिलदादा देशमुख यांच्या जुन्या घरावरून रात्री 9 वाजता दर्गाह येथे जाईल.

या दरम्यान मिरवणुकीवर ठिकठिकाणी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात येते. रात्री 9 वाजता बाबांच्या समाधी स्थळावर तलवारीचा मुक्काम असतो. यावेळी भाविकांना तलवारीचे दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तलवार मिरणुकीसाठी दर्गा मार्गावर सत्याच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण हटविण्यात आल्याने 80 फुट रस्ता मोकला झाला असून दर्शनासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग करण्यात आली आहे. त्यासाठी 270 पोलीस कर्मचारी, 14 पोलीस अधिकारी, 2 आरसीसी प्लाटून, वापरलेस टॉवर अशी व्यवस्था असून दुर्बिनद्वारे देखील नजर ठेवण्यात येत आहे.