Monday, May 4, 2026
HomeनगरSangamner : मांडवे बुद्रुक येथे तरुणाचा मृतदेह आढळला

Sangamner : मांडवे बुद्रुक येथे तरुणाचा मृतदेह आढळला

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील शिवमंदिर भवनाच्या सभामंडपात तरुणाचा रविवारी (दि,12) सकाळी 7 वाजता मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (वय 31, रा. मूळ रा. जांभुळबन, ता. राहुरी, हल्ली रा. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शिवमंदिर भवनाच्या सभामंडपात मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शिवाजी विठ्ठल बाचकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोना. डी. एम. चौधरी हे करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ४ मे २०२६ – राजधर्माची कठोर परीक्षा!

0
पुणे जिल्ह्याच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीत अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांनी माणुसकीची मान शरमेने झुकली. नसरापूरमध्ये एका ६५ वर्षीय नराधमाने चार...