Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमाणिकपूंज धरण तुडूंब

माणिकपूंज धरण तुडूंब

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्याचे वैभव असलेले माणिकपूंज धरण अखेर काल ओव्हरफ्लो होवून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्यासह सिंचनाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने शहरवासियांसह शेतकरी सुखावले आहे.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यात यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप हंगामाला मोठा हातभार लागला होता. उघडकीप घेत पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे माणिकपुंज धरण भरून आज सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शहरवासियांसह शेतकर्‍यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात पर्जन्यमान कमी होत असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतात.

मात्र गत वर्षापासून वरुणराजा बरसत असल्याने पाणीटंचाई संकटाची तीव्रता फारशी जाणवली नव्हती. दरवर्षी जुलै अखेरमध्ये ओव्हरफ्लो होणारे माणिकपूंज गतवर्षी मात्र सप्टेंबर महिन्यात झाले होते. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जुलैअखेर माणिकपूंज ओव्हरफ्लो झाले आहे. ३३५ दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची साठवण क्षमता आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील जळगांव बुद्रुक, न्यायडोंंगरी, पिंंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिगणेदेहरेसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना तसेच नांदगाव शहराला माणिकपूंज भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या