Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमराठा आरक्षणासाठी लढा निर्णायक टप्प्यावर, आता माघार नाही…थेट मुबई गाठायची… -खेडलेझुंगे येथे...

मराठा आरक्षणासाठी लढा निर्णायक टप्प्यावर, आता माघार नाही…थेट मुबई गाठायची… -खेडलेझुंगे येथे मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

करंजी खुर्द | प्रतिनिधी Karanji khurda

- Advertisement -

‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून, यावेळी कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला,तर समाज त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही’, असा ठाम इशारा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला.खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता पार पडलेल्या भव्य महामेळाव्यात ते बोलत होते.

खेडलेझुंगे येथे जरांगे पाटील यांचे महिला भगिनींनी औक्षण करत स्वागत केले. नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मराज घोटेकर,विजय सदाफळ यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी परिसरातील निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यातून हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात जरांगे पाटील म्हणाले, ”मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही,जे हक्काचे आहेत ते मिळवून घेणारच.आपले आरक्षण आपल्याला मिळवायचे आहे.आरक्षण ती मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.ही लढाई शेवटच्या टप्प्यावर आली आहे. येत्या दि. २९ ऑगस्ट रोजी आपण निर्णायक लढा उभारणार आहोत. त्या दिवशी मुंबईकडे कूच करताना नाशिक आणि पुणे जिल्ह्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे.कोणतीही माघार न घेता आपण संपूर्ण ताकदीने मैदानात उतरायचं आहे.”

तब्येत सांभाळून मराठा आरक्षण साठी च लढा लढत राहणार आहेत.तुम्ही एकदिलाने साथ द्या असे मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन समाजाला केलं.

या मेळाव्यात समाजाच्या एकजुटीचा निर्धार व्यक्त करत मराठा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी प्रवीण कदम, प्रसाद फापाळे,अभिजित डुकरे, राजेश भडांगे,राहुल वाघ, धर्मराज घोटेकर, विजय गिते, गणेश गोरडे, अजय सदाफळ, अजिंक्य साबळे, अमोल मेमाणे, कल्पेश वायकर, भैय्या घोटेकर, अनिकेत साबळे, सागर भारस्कर, नारायण सदाफळ, ऋषी घोटेकर, अनिल सदाफळ, बाबा गोसावी, प्रदीप परदेशी, निलेश घोटेकर, सागर सदाफळ, शरद गिते, सुनील माळी, विठ्ठल बेर्डे आणि विष्णू मेमाणे यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...