Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : देवदर्शनासाठी आलेल्या माजी अधिकारी वृद्धेचे ३१...

Nashik Crime News : देवदर्शनासाठी आलेल्या माजी अधिकारी वृद्धेचे ३१ लाखांचे साेने लंपास

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये तिर्थाटनासाठी आलेल्या मुंबईतील एका ८३ वर्षीय सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचे ३८ ताेळे सोन्याचे दागिने मुक्कामाच्या हॉटेलमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॉटेल मॅनेजरने दैनंदिन कामासाठी पुरवलेल्या केअर टेकरच्या संशयास्पद भूमिकेभोवती तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.

- Advertisement -

​मुंबईतील (Mumbai) कांदिवली पूर्व येथील रहिवासी आणि महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) कृषी खात्यातून निवृत्त झालेल्या ८३ वर्षीय शोभा पंढरीनाथ सोनवणे १४ जुलै २०२६ रोजी नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आल्या होत्या. शरणपूर रोडवरील ‘हॉटेल सिटी प्राइड’ येथे मुक्कामी असताना, त्यांनी दैनंदिन कामात मदतीसाठी हॉटेल मॅनेजरकडे केअर टेकरची मागणी केली होती. त्यानुसार हॉटेल मॅनेजरने एका केअर टेकरची दररोज ५०० रुपये मानधनावर नियुक्ती करून दिली.

दरम्यान, २० जुलै रोजी देवदर्शन आटोपून शोभा सोनवणे मुंबईतील घरी परतल्या. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बॅग तपासली असता, त्यात ठेवलेले एकूण ३८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे निष्पन्न झाले. हॉटेलमध्ये (Hotel) राहण्याच्या कालावधीतच अज्ञाताने हे दागिने (Jewelry) चोरल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांत (Police) धाव घेतली.

लांबवलेल्या दागिन्यांचा तपशील

​सोन्याच्या बांगड्या (१०० ग्रॅम): ९,००,००० रुपये
​सोन्याच्या पाटल्या (८० ग्रॅम): ७,००,००० रुपये
​सोन्याची मंगळसूत्र (९० ग्रॅम): ६,००,००० रुपये
​सोन्याचे कडे (७० ग्रॅम): ४,००,००० रुपये
​सोन्याची साखळी (४० ग्रॅम): २,५०,००० रुपये
​सोन्याच्या वळ्या (१५ ग्रॅम): १,५०,००० रुपये
​सोन्याच्या अंगठ्या (१५ ग्रॅम): १,५०,००० रुपये
(एकूण ३८५ ग्रॅम वजनाचे ३१ लाख ५० हजार रुपयांचे दागिने)

ताज्या बातम्या

संभाजी

एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गैरकारभारावरुन राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार...