परभणी । Parbhani
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. २५ जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलता होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
तसेच, मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच…, असं विधान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. २ कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.