Friday, November 13, 2026
Homeदेश विदेशभीषण अपघात! टेम्पो ट्रॅव्हलरला समोरुन येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक; २३ जणांचा मृत्यू...

भीषण अपघात! टेम्पो ट्रॅव्हलरला समोरुन येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक; २३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

नवी दिल्ली | New Delhi
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) काळजाचा थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात किमान २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. ही धडक इतकी भीषण होती की यात ट्रॅव्हलरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश सुरु झाला. अपघातात इतरही अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात काझीरंगा येथील रोंगाजान परिसरात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की ट्रॅव्हलरचे तुकडे-तुकडे झाले. गाडीतील प्रवाशांना स्वतःला वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्याला सुरुवात केली.

- Advertisement -

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती, अशी माहिती समोर आली आहे. गोलाघाटचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

Kaziranga, Assam: Several people were injured after a truck collided head-on with a passenger vehicle at Rongajan in Kaziranga. More than 35 people, including college students, were travelling in the vehicle at the time of the accident. The injured were rushed to Kohora Model Hospital, while those in critical condition were shifted to hospitals in Bokakhat and Jorhat— IANS (@ians_india) November 13, 2026

डेका म्हणाले की, अपघातात २३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधून नेमके किती लोक प्रवास करत होते, याची मात्र अद्याप माहिती कळू शकलेली नाही.

अपघाताची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि ट्रॅव्हलर व कंटेनर ट्रकची धडक कशी झाली, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या