मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत. त्यांनी आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पण लाखो आंदोलक मुंबईत आल्यामुळे त्याच्या, राहण्याची, खाण्या-पिण्याची काहीच व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली नाही असा अरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर काय पोस्ट केली?
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात, असे रोहित पवार म्हणाले. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात, असे रोहित पवारांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे सरकारने उपलब्ध करुन दिल्या नाही
आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असं रोहित पवारांनी म्हटले आहे.
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.
या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!





