Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमNashik Accident News : बळी मंदिर उड्डाणपुलावर अपघात; महिला जागीच ठार, पती...

Nashik Accident News : बळी मंदिर उड्डाणपुलावर अपघात; महिला जागीच ठार, पती जखमी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी परिसरातील (Panchvati Area) बळी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी (२७ जुलै) रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मालवाहू ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर निष्काळजी चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक विश्वनाथ मोरे हे त्यांच्या पत्नीसह स्प्लेंडर मोटारसायकलने (एमएच ४१ यु ४४२५) प्रवास करत होते. बळी मंदिरासमोरील उड्डाणपुलावर (Flyover) आले असताना पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या अज्ञात मालवाहू ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली. धडक लागताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दुर्दैवाने ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक मोरे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मृत महिलेचे भाचे दीपक अमृत तमखाने (वय २६, रा. उत्तम नगर, सिडको, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. मेरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Land Scam : म्हाडा खटल्याचे ‘काऊंटडाऊन’; दोषारोप पत्राच्या प्रतीसाठी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात गाजलेल्या नाशिकमधील म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्याचा (MHADA Land Scam) खटला अखेर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District Court)...