रत्नागिरी | Ratnagiri
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोल करणार नाहीत, यासाठी आम्ही जे जे काय लागतील ते प्रयत्न करू, असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केले. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ओबीसी समाजाचे (OBC Reservation) आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कायम आहे. भविष्यामध्ये सुद्धा ही भूमिका कायम राहणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. ते शनिवारी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना दोघांनाही आमचं सांगणं आहे की, कोणाचंही आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण देणार नाही. दोन्ही समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेले आव्हान देशातल्या भगिनींसाठी महत्त्वाचे आहे. या विषयाला विरोधक वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जात आहेत, त्यापेक्षा या विधेयकाला सहकार्य करावे आणि राजकीय महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा. या मुद्द्यावरुन राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या विधेयकाच्यादृष्टीने सकारात्मक विचार केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले.




