Saturday, June 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये...

Maratha Reservation : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती

मुंबई । Mumbai

मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. मराठा समाजातील तरुणाईला उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आल्या आहेत. या क्रांतीकारी निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या उच्च शिक्षणाची वाट सुकर होणार आहे.

- Advertisement -

शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल ८ विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेकदा गुणवंत विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते, हीच अडचण ओळखून शासनाने हा मास्टरस्ट्रोक मारला आहे.

ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या 8 प्रमुख सवलती

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होईल.
  • वाहन चालक व वाहक प्रशिक्षण : मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती : इयत्ता 9 वी ते 12 वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी विस्तारित करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती : विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती (Reimbursement) थेट शासनाकडून करण्याची योजना यात समाविष्ट आहे.
  • परराज्यातील शिक्षणासाठी सवलत : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे, परंतु परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Professional Courses) प्रवेश घेतलेल्या मराठा उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र : इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास आता मराठा समाजासाठी खुला करण्यात आला आहे. सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी पूर्णपणे पात्र धरले जातील.
  • रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ : केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर, प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावरील (Institutional Level) जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत.

भविष्यात इतर मागास प्रवर्गास (OBC) ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करण्यात येतील, त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता मराठा समाजास आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...