Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मविप्र विद्यापीठाचा वाद शरद पवारांच्या दरबारी; अध्यक्ष सुनील ढिकलेंनी...

Nashik News : मविप्र विद्यापीठाचा वाद शरद पवारांच्या दरबारी; अध्यक्ष सुनील ढिकलेंनी पदाधिकाऱ्यांसह घेतली भेट

शरद पवार म्हणाले, "आपली पसंती..."

नाशिक | Nashik

मविप्र संस्थेत (MVP Sanstha) स्वयंम सहाय्यित विद्यापीठ (University) स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन असला तरी त्या विद्यापीठाला आपली पसंती नाही. असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. मविप्र संस्थेचे सत्ताधारी आणि विरोधकांत मविप्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या विषयावरून वाद रंगला असून, या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले (Sunil Dhikle) यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने शहरातील आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे आज (रविवारी) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एका हॉटेलमध्ये शरद पवार मुक्कामी असताना ढिकले यांच्यासह मविप्र पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

नाशिकची मराठा विद्या प्रसारक समाज ही राज्यातील आघाडीची आणि सुमारे दहा हजार सभासद असलेली शिक्षण (Education) संस्था आहे. रयत शिक्षण संस्थे खालोखाल बहुजन समाजाची संस्था म्हणून तिचे नाव मविप्र संस्थेत स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात डॉ. ढिकले यांच्यासह माजी चिटणीस पंडितराव पिंगळे, प्रणव वसंतराव पवार, मोहनराव पिंगळे आणि सचिन पिंगळे यांनी यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेने अद्याप स्वतंत्र विद्यापीठाचा विषय स्वीकारलेला नाही. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत ३५ हजार विद्यार्थी (Student) शिक्षण घेतात. मात्र, या संस्थेतही स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा विचार आम्ही टाळला. पुणे विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या पदवीला सर्व दूर मान्यता आणि प्रतिष्ठा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र विद्यापीठाऐवजी पुणे विद्यापीठाची पदवी नेहमीच पसंती असते. त्यात शैक्षणिक हित देखील आहे, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस आता थेट गावाच्या दारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस...