मुंबई | Mumbai
बिग बॉस मराठी सीझन चार गाजवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं हिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तेजस्विनीनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिच्या साखरपुड्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने काम केले आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. तेजस्विनीने आजवर अनेक चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.
तेजस्विनी लोणारी हिने मराठी बिग बॉसचा चौथा सीझन गाजवला होता. त्या सीझनमध्ये तिला हाताला झालेल्या दुखापतीमुळे नाईलाजास्तव शो मधून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, आता तिने गुपचूप साखरपूडा आटोपल्याचे समजत आहे.
राजकारणी घराण्याशी जोडले जाणार संबंध
अभिनेत्री तेजस्विनी ही एका मोठ्या राजकीय घराण्याची सून होणार आहे. राज्यातील बड्या नेत्याच्या लेकासोबत तिचा साखरपुडा झाला. मात्र, तेजस्विनीचे लव्ह मॅरेज की अरेंज याबद्दल अजून तरी फार काही माहिती मिळू शकली नाही. तेजस्विनी लोणारी हिने शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी साखरपुडा केला.
तेजस्विनी आणि समाधान या दोघांचा साखरपुडा मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. समाधान सरवणकर हे सुद्ध राजकारणात सक्रीय आहेत.
साखरपुड्यासाठी तेजस्विनीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हातात हिरवा चुडा आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांची भेट कुठे झाली? दोघांचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
कोण आहे समाधान सरवणकर?
गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांप्रमाणेच समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहे. विशेष: मुंबईतील वरळी भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी नुकताच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सारखपुडा केला. आता साखरपुड्यानंतर समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी लग्न नेमके कधी करणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तेजस्विनी लोणारी हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





