मुंबई | Mumbai
इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणारा निर्णय सरकारने (State Government) मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेकडून शनिवारी (दि.५) आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
आज सकाळी वरळी डोममध्ये (Varali Dom) पार पडणाऱ्या या मेळाव्यासाठी (Melava) मुंबईत जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली असून आवाज मराठीचा ! या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूनी जनतेला विजयी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू (Brother) एकाच व्यासपीठावर येणार असल्याने मेळाव्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वरळी डोममध्ये पार पडणाऱ्या या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू कार्यकर्त्यांना काय आदेश देणार याविषयी उत्सुकता आहे. मात्र या आदेशापूर्वीच ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. आणखी एका बॅनरद्वारे तर महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी मराठीसाठी ठाकरेच ! ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोण-कोणत्या मराठी महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचे आहे. आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.
ठाकरे कुटुंबीय दिसणार एकत्र
आजच्या मेळाव्यानिमित्त तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे कुटुंबीय एकत्र दिसणार आहेत. आज मेळाव्यात स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील. तसेच भाषणं फक्त ४ जण करण्याची शक्यता आहे. याशिवाय रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्रच दिसणार आहेत. ठाकरेंचे कुटुंब व्यासपीठासमोर पहिल्या रांगेत बसतील, अशी माहिती समोर आली आहे.




