Saturday, October 3, 2026
Homeक्राईमCrime News : साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

Crime News : साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

मारहाण करून नाते तोडल्याचा आरोप || तरूणाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

साखरपुडा झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरूणीच्या इच्छेविरूध्द तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा, तसेच नंतर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकाश दिनेश राठोड (रा. नाना पाटील तालीम शेजारी, नालेगाव, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीने सोमवारी (24 ऑगस्ट) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी तरूणी (वय 29) ही अहिल्यानगर शहरात आजीसोबत राहत असून खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करते. तिच्या फिर्यादीनुसार, 22 मे 2026 रोजी दुचाकी दुरूस्तीसाठी ती माणिकनगर येथील शोरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची आकाश राठोड याच्याशी ओळख झाली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. फिर्यादीने आकाशला यापूर्वी आपल्यावर अत्याचार झाल्याचा व गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली होती. ही बाब माहिती असूनही आकाश तिच्याशी संपर्कात राहिला. त्यानंतर त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला आणि तरूणीनेही त्यास होकार दिला. 5 जुलै 2026 रोजी बुर्‍हानगर येथे आकाशच्या नातेवाईकाच्या घरासमोर दोघांचा साखरपुडा झाला. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे वाढले.

तरूणीच्या आरोपानुसार, 15 जुलै रोजी आकाश तिला नालेगाव येथील त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरूणीने त्याला नकार दिला असतानाही त्याने लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवले आणि तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर 17 जुलै ते 26 जुलैदरम्यानही आकाशने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही दिवसांनी आकाशचे दुसर्‍या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तरूणीला समजले. याबाबत तिने आकाशला विचारणा केली असता त्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची आणि आत्महत्या करून तुला अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...