Thursday, September 10, 2026
Homeक्राईमRahuri : लग्नासाठी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rahuri : लग्नासाठी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी देत एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, जून 2026 मध्ये आरोपीने पीडितेला फोन करून शिवीगाळ केली. तसेच, तू माझ्याशी लग्न करायचे. दुसर्‍या कोणाशी लग्न केले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. याचप्रमाणे, 7 जुलै रोजी सायंकाळी आरोपीने पीडितेच्या एका नातेवाईकाला फोन करून, तिचे लग्न ज्या मुलासोबत ठरवले आहे, त्याला आमचे फोटो दाखवीन. आमच्या समाजातील लोकांना लग्नात घेऊन येतो, मग काय होते ते बघा, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ओंकार प्रभाकर उर्फ महम्मद वैरागर (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 352 तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाचा प्रयत्न करणाऱ्या अंगरक्षकाचे नाशिक...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुंबईतील (Mumbai) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यक्रमापूर्वी बनावट पीएमओ अधिकारी रोहन पारेख आणि...