Friday, October 2, 2026
Homeक्राईमCrime News : तीन लाखासाठी विवाहितेचा सासरी छळ; फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा...

Crime News : तीन लाखासाठी विवाहितेचा सासरी छळ; फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar

विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून सासरच्या मंडळींनी घराबाहेर हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे राहत असलेल्या 20 वर्षीय विवाहितेने शनिवारी (30 ऑगस्ट) दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शहबाज इकबाल शेख, शेरबानो इकबाल शेख, इकबाल शफी शेख, फरीन इकबाल शेख, सोफीया जुनेज शेख आणि आलिया इकबाल शेख (सर्व रा. दापोली, ता. जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जानेवारी 2025 ते 1 जुलै 2025 या कालावधीत फिर्यादी सासरी (दापोली, पुणे) नांदत असताना पतीसह सहा जणांनी तिचा हुंड्या म्हणून तीन लाख रूपये माहेरहून आणण्यास सांगितले. यासाठी संशयित आरोपींनी पीडितेला वेळोवेळी शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, उपाशी ठेवणे आणि दमदाटी करत शारीरिक-मानसिक छळ केला.

अखेरीस त्यांना क्रूर वागणूक देत घराबाहेर हाकलून सासरी नांदण्यास नकार दिला. यामुळे फिर्यादी माहेरी परतल्या. त्यांनी भरोसा सेल, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. तेथे समेट न झाल्याने त्यांनी शनिवारी दुपारी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार पी. ए. बारगजे करीत आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...