Tuesday, September 29, 2026
HomeनगरSangamner : विवाहितेची जाचाला कंटाळून आत्महत्या

Sangamner : विवाहितेची जाचाला कंटाळून आत्महत्या

घारगाव |वार्ताहर| Ghargaon

संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात एका विवाहित महिलेने मानसिक त्रास व धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

भागूबाई काशीनाथ खेमनर असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी (दि.28) सकाळी सुमारे 9 वाजता जुन्या बिरोबा मांगमळई परिसरात आढळून आला. याप्रकरणी विठ्ठल हरीबा खेमनर (वय 36, रा. हिरेवाडी, साकूर) यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार विश्वास भाऊसाहेब लोहटे, भाऊसाहेब नामदेव लोहटे, विमलबाई भाऊसाहेब लोहटे, बाळासाहेब भाऊसाहेब लोहटे आणि सर्‍याबापू भाऊसाहेब लोहटे (सर्व रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास लोहटे हा भागूबाई खेमनर यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी धमकावत होता. तसेच या कारणावरून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून भागूबाई यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच अन्य चार जणांनी विश्वास लोहटे याला या कृत्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...