Friday, October 30, 2026
Homeक्राईमShrirampur : पैशासाठी होत असलेल्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Shrirampur : पैशासाठी होत असलेल्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील माहेर असलेल्या अवघ्या 23 वर्षीय सायली वानखेडे हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी पैशांची मागणी, घरकामावरून होणारा छळ, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण याला कंटाळून सायलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि अन्य एका नातेवाईकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, सायलीचा विवाह 10 ऑगस्ट 2025 रोजी महांकाळवाडगाव येथील प्रतीक वानखेडे याच्याशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, लग्नानंतर सुमारे दोन महिन्यांनी पतीला पुणतांबा येथे मेडिकल दुकान सुरू करायचे असल्याचे सांगून माहेरून 50 हजार रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार सायलीच्या माहेरच्या मंडळींनी 50 हजार रुपये रोख दिले. त्यानंतरही आणखी एक लाख रुपये आणण्यासाठी सायलीवर दबाव टाकण्यात येत होता, असे तिच्या आईने फिर्यादीत म्हंटले आहे.

घरातील कामावरून वारंवार बोलणे, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण होत असल्याचे सायलीने फोनवरून सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मुलीचा संसार टिकावा म्हणून आई-वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगितले; मात्र तरीही सासरच्या लोकांकडून त्रास देणे न थांबल्याने 18 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.36 वाजता सायलीने आईला फोन करून सासरी होणार्‍या त्रासाला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले आणि तातडीने येण्याची विनंती केली. त्यानंतर तिला साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.12 वाजता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर सायलीच्या माहेरच्या मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला.

28 ऑक्टोबर रोजी महांकाळवाडगाव येथे सायलीचा दशक्रिया विधी सुरू असताना तिचे माहेर असलेल्या निपाणी वडगाव येथील नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याने विधीदरम्यान सासरच्या मंडळींना चांगलाच चोप देऊन निपाणी वडगाव येथील नातेवाईकानीं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन प्रतिक दिपक वानखेडे, दिपक पांडूरंग वानखेडे, नंदा दिपक वानखेडे यांच्यासह एकाविरुध्द भारतीय न्याय संहीता कामल 108, 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात पढेगांव येथील घटनेनंतर महांकाळ वाडगाव येथील सायलीच्या मृत्यूने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा, वैवाहिक छळाचा आणि हुंड्यासाठी होणार्‍या कथित दबावाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एकीकडे वाढत्या सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे अविवाहित तरुणांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे विवाहानंतर विवाहित महिलांचा छळ, हुंड्यासाठी पैशांची मागणी आणि मानसिक-शारीरिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत.

ताज्या बातम्या

AMC : फ्लेक्समुक्त नगरसाठी मनपाचा पुढाकार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहराचे विद्रुपीकरण रोखून अहिल्यानगरला फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि अन्य ठिकाणी लावण्यात येणार्‍या सर्व...