Sunday, September 13, 2026
Homeक्राईमCrime News : हुंड्यासाठी दोन विवाहितांचा छळ

Crime News : हुंड्यासाठी दोन विवाहितांचा छळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात हुंडा व पैशांच्या मागणीसाठी विवाहितांचा छळ केल्याच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत. सावेडी आणि मुकुंदनगर परिसरातील या घटनांमध्ये एकूण 15 जणांविरूध्द तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सावेडी परिसरातील 27 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि महागड्या वस्तूंच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत असून जुलै 2024 मध्ये तिचा विवाह झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी सोन्याचे दागिने व मानपान दिले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पती, सासू, सासरे, दीर, नणंद आदींनी संगनमत करून छळ केल्याचा आरोप आहे. सासूसाठी महागडा मोबाईल, चारचाकी वाहन तसेच पुण्यात 35 लाख रूपयांचा फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावण्यात आला असेही फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मुकुंदनगर परिसरात राहणार्‍या 42 वर्षीय विवाहितेने माहेरून 10 लाख रूपये आणण्यासाठी छळ केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2025 पासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पती, सासू, सासरे, चुलत दीर आणि एक महिला (सर्व रा. इंदापूर, पुणे) यांनी संगनमत करून घरखर्च व नवीन चारचाकी वाहन खरेदीसाठी 10 लाख रूपये आणण्याची मागणी लावून धरली होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

हॉकी ज्युनियर आशिया कप २०२६ : हॉकीमध्ये भारताचा ‘डबल धमाका’; महिला-पुरुष...

0
दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद...