Friday, July 24, 2026
Homeक्राईममूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

पतीसह तिघांविरूध्द गुन्हा || पीडितेची तोफखाना पोलिसांत फिर्याद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील चितळे रस्त्यावर माहेरी राहणार्‍या पीडित विवाहितेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (9 जून) फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह तिघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पती सुरज रमेश जमदाडे, सासू छाया रमेश जमदाडे, नणंद स्नेहल सुनील गायकवाड (सर्व रा. गुलमोहर सोसायटी, पोस्ट कॉलनी मागे, जमदाडे वस्ती, वालचंदनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 15 मे 2019 रोजी फिर्यादीचा विवाह सुरज जमदाडे सोबत झाला होता. तेव्हापासून फिर्यादी सासरी वालचंदनगर येथे नांदत असताना सासरच्यांनी दोन महिने व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पती सुरज, सासू छाया व नणंद स्नेहल यांनी शाररिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. ते फिर्यादीला मारहाण करत होते. दरम्यान त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने न्यायालयात पोटगी मिळण्याबाबत प्रकरण दाखल केले होते.

त्यानंतर सासरच्यांनी तडजोड करून फिर्यादीला नांदण्यास नेले. एक महिना व्यवस्थित नांदवल्यानंतर पुन्हा छळ सुरू केला. मूलबाळ होत नाही म्हणून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. फिर्यादीचे वडिल भेटण्यासाठी आले असता त्यांच्यासोबत देखील सासरच्यांनी वाद घातले होते. दरम्यान सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी माहेरी नगरला निघून आली. तिने भरोसा सेलकडे तक्रार केली. मात्र तिच्या सासरचे लोक एकाही तारखेला हजर न राहिल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. पीडिताने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अनिल गिरीगोसावी करत आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...