Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमपैशांसाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

पैशांसाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

पीडितांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पैशांसाठी दोन विवाहितांचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मूळ सावेडीतील एकविरा चौकात राहणार्‍या व सध्या वारूळवाडी (ता. नगर) येथे माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी (13 नोव्हेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत रवींद्र गव्हाणे, आरती रवींद्र गव्हाणे, कावेरी प्रकाश नरवडे, मानसी जगदीश उगले, जगदीश शिवाजी उगले (सर्व रा. एकविरा चौक, सुखकर्ता कॉर्नर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सासरच्या लोकांनी फिर्यादीला हुंड्याचे पैसे कमी आणले म्हणून मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

- Advertisement -

मूळ मोहटा (ता. पाथर्डी) व सध्या बोल्हेगाव उपनगरातील पंचवटीनगर येथे माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अमोल कुंडलिक खंडागळे, सासरे कुंडलिक खंडागळे, सासू सुमन कुंडलिक खंडागळे, नणंद पूजा रवींद्र आल्हाट व तिचा पती रवींद्र अरूण आल्हाट (सर्व रा. मोहटा ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत म्हणून फिर्यादीचा सासरच्यांनी छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या