Tuesday, July 23, 2024
Homeदेश विदेशक्षणार्धात अख्खा डोंगर कोसळला! बद्रीनाथमधील भूस्खलनचा विदारक Video

क्षणार्धात अख्खा डोंगर कोसळला! बद्रीनाथमधील भूस्खलनचा विदारक Video

बद्रीनाथ । Badrinath

- Advertisement -

मुसळधार पावसाने (Heavy Rain) महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात थैमान घातलं आहे. सध्या राज्यासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसत आहे.

नुकतीच उत्तराखंड (Uttarakhand) येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमधील चमोली (Chamoli) येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. दरम्यान या थरारक घडनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Landslide Video)

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून सतत डोंगर कोसळल्याच्या बातम्या समोर येत आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातूनही डोंगर कोसळल्याचा हा विदारक व्हिडीओ समोर आला आहे. (Uttarakhand Landslide Video)

अगदी क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखा हा डोंगर कोसळला, डोंगर कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे जोसीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या