Thursday, November 5, 2026
Homeक्राईमRahuri : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत महिलेवर मौलानाकडून अत्याचार

Rahuri : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत महिलेवर मौलानाकडून अत्याचार

तडजोडीसाठी दुसर्‍या मौलानाकडून दबाव व विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आईच्या आजारपणावर उपचार व आराम मिळावा, या कारणाने मौलानाकडे गेलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील 32 वर्षीय अविवाहित महिलेवर राहुरी फॅक्टरी येथील एका लॉजमध्ये जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेशी दुसर्‍या एका मौलानाने अश्लील वर्तन करून विनयभंग केला.

- Advertisement -

प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची तडजोड करण्याचा दबाव टाकत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोन मौलानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील 32 वर्षीय महिला आईची प्रकृती नेहमीच खराब असल्याने तिला आराम मिळावा, या उद्देशाने ती राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील मशिदीतील मौलानाकडे जात होती. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती आईच्या आजारपणासाठी तावीज घेण्यासाठी मशिदीत गेली होती. तावीज घेऊन मशिदीबाहेर पडत असताना तिला शरीफ शेख नामक दुसरा मौलाना भेटला. त्याने आईला आराम मिळण्यासाठी मोठ्या मौलानाकडे जाण्याचा सल्ला देत स्वतः तिला तेथे घेऊन जाण्याचे सांगितले.

त्यानुसार त्याने महिलेला मोटारसायकलवर बसवून राहुरीच्या दिशेने आणले. राहुरी फॅक्टरी परिसरातील एका लॉजसमोर मोटारसायकल थांबवून तेथे ओळखीचे मोठे मौलाना थांबले असल्याचे सांगत तिला लॉजमधील खोलीत नेले. मात्र, खोलीत अन्य कोणीही नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आरोपी शरीफ शेख याने तिला शिवीगाळ करून कपडे काढण्यास भाग पाडले. तसेच तिचे हात-पाय ओढणीने बांधून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अत्याचारानंतर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी बाथरूममध्ये गेला. याच संधीचा फायदा घेत महिलेने आरोपीला बाथरूममध्ये कोंडून तेथून पळ काढला. दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महिला अहिल्यानगर येथील बाराबाभळी परिसरातील मदरशात गेली. तेथे तिने मोठ्या मौलानाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुफ्ती मौलानाने शरीफ शेख याला तेथे बोलावून घेतले. मात्र, यावेळी मुफ्ती मौलानानेच महिलेशी अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच प्रकरणाची बदनामी होऊ नये म्हणून पैसे घेऊन तडजोड करण्याचा सल्ला दिला. महिलेने त्यास नकार दिल्यानंतर ‘इकडे येऊन आमची बदनामी करते का?’ असे म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी मौलाना शरीफ सुलेमान शेख व मुफ्ती मौलाना (दोघे रा. बाराबाभळी मदरसा, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2)(एम), 115(2), 351(2)(3), 352 व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मौलाना शरीफ सुलेमान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ नोव्हेंबर २०२६ – राष्ट्रवादीत खदखद, महायुतीत धडधड

0
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थतेला आता दिल्लीचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा...