Friday, July 24, 2026
HomeनगरPathardi : मावा विक्रेत्यांवर कारवाई; 1 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pathardi : मावा विक्रेत्यांवर कारवाई; 1 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

जिल्हा विशेष पोलीस पथकाने पाथर्डी शहरात तीन ठिकाणी मावा विक्रेत्यांवर कारवाई करत सुमारे 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अभिजीत लांडे व सुनिल सानप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अक्षय गणेश इधाटे व राहुल अर्जुन सानप फरार आहेत.

- Advertisement -

दि. 11 जुलै रोजी सायंकाळी पाथर्डी शहरातील चिंचपूर रोडवरील अक्षय पान टपरी येथे अभिजीत मिनिनाथ लांडे (29, आनंदनगर, पाथर्डी) नावाच्या इसमाकडून मावा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखले, शंकर चौधरी, अमोल कांबळे, सुनील पवार या पथकाने छापा टाकला. छाप्यात 5 हजार 600 रुपये किमतीचा 8 किलो तयार जप्त करण्यात आला असून, लांडे याने पुढील चौकशीत सुगंधित मावा आणि तंबाखू अक्षय इधाटे, सुनिल व राहुल सानप यांच्याकडून घेत असल्याची कबुली दिली.त्यानूसार, पथकाने इंदिरानगर परिसरातील अक्षय गणेश इधाटे याच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकून तेथून 60 हजार 800 रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू व मावा जप्त केला.

यानंतर लांडे याने पथकाला तनपुरवाडी येथील दिनकर कुटे यांच्या विटभट्टीजवळील शेड येथे घेऊन गेले, जिथे सुनिल बाबासाहेब सानप (36, शिरसाटवाडी) उपस्थित आढळला. त्याठिकाणी तपासणीदरम्यान 10 किलो मावा, 12 पुडे सुगंधित तंबाखू व एक मावा तयार करण्याचे 55 हजार रुपये किमतीचे मशीन असा एकूण 66 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तीन ठिकाणांवर करण्यात आलेल्या कारवायांमध्ये दोन लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन आरोपींना शनिवारी(दि.12) पाथर्डी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....