Monday, June 1, 2026
HomeनगरAMC Election : ‘माझी मनपा सेल्फी’ उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ

AMC Election : ‘माझी मनपा सेल्फी’ उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ

नगर मनपा स्वीप समितीच्यावतीने ‘वोट सेल्फी पॉईंट्स’चे प्रदर्शन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्यावतीने ‘माझी मनपा सेल्फी’ संकल्पनेअंतर्गत सुमारे 15 वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. मतदान कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षण ठिकाणी तसेच स्वीप नगरीमध्ये हे पॉईंट्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. मतदानाची तारीख असलेल्या 15 या अंकाच्या आकाराचे सेल्फी पॉईंट्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 15 तारखेला मतदानाची टक्केवारी वाढवा, असा संदेश देणार्‍या या सेल्फी पॉईंट्सवर अनेकांनी उत्साहाने सेल्फी काढले. शहरातील उद्याने आणि मुख्य चौकांमध्येही हे सेल्फी पॉईंट्स लावण्यात येत आहेत.

- Advertisement -

या सेल्फी पॉईंट्सवर आपले मतदान 15 जानेवारी 2026 रोजी आहे, एक वोट सेल्फी तो बनता है, मैं भारत हूँ.. मैं मेरे लिये मतदान करूँगा, मी महाराष्ट्र आहे.. मी माझ्यासाठी मतदान करणार, मी अहिल्यानगर आहे… मी माझ्यासाठी मतदान करणार तसेच रिश्ते में तो हम तुम्हारे भारतीय लगते हैं.. नाम है अहिल्यानगर के मतदार, आमचं अहिल्यानगर भारी.. आमचं मत भारी.. 15 जानेवारीला आमचं मतदान पण भारी अशा आकर्षक घोषवाक्यांनी मतदारांच्या चेहर्‍यावर हास्य उमटले. ‘एकी’ नावाची मुंगी (मॅस्कॉट) आणि विविध भौमितिक आकारातील सेल्फी पॉईंट्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. प्रशिक्षणाच्या दोन टप्प्यात हजारो कर्मचार्‍यांनी येथे सेल्फी काढले.

आपले नाव मतदार यादीत शोधा, आपले मतदान केंद्र शोधा, मनपा स्वीप समितीचे उपक्रम पहा व आपले सेल्फी फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करा अशा 4 संकल्पनांचे 4 क्यूआर कोड येथे लावण्यात आले आहेत. 8055809394 या अहिल्यानगर मनपाच्या स्वीप केअर व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपला सेल्फी पाठवल्यास सहभागींना प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : विषारी दारूनंतर आली जाग; नाशिकला चार दिवसांत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पुण्यातील (Pune) हडपसर व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे २१ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या भीषण...