Monday, October 14, 2024
Homeनाशिकहोमगार्डची गुणवत्ता यादी जाहीर; हरकती पडताळणीनंतर अंतिम यादी

होमगार्डची गुणवत्ता यादी जाहीर; हरकती पडताळणीनंतर अंतिम यादी

सणोत्सवात नवी कुमक

नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील होमगार्डच्या चार पथकांतील एकशे तीस रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर १ हजार ४१ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या गुणवत्ता यादीवरील काही हरकतींची पडताळणी करुन अंतिम निवड यादी जारी होणार आहे. त्यामुळे आगामी नवरात्रोत्सव, दिवाळी या सणोत्सवांसह विधानसभा निवडणुकीत होमगार्डची नवीन बॅच कार्यरत होणार आहे.

पोलीस ठाण्यांत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेकदा नाकाबंदी व इतर बंदोबस्तासाठी नेमण्याचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालयाने जुलै महिन्यात पोलीस ठाणेनिहाय जागा निश्चित करून त्यानुसार अर्ज मागवले होते. त्यानुसार १३० जागांसाठी अकरा हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी मैदानी चाचणीत पात्र ठरुन गुणवत्ता यादीत १ हजार ४१ उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. त्यानुसार प्राप्त हरकर्तीची पडताळणी सुरू आहे.

- Advertisement -

पुढील आठवड्यात निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, धावण्याच्या चाचणीत अनेकांनी पैकीच्या पैकी गुण घेतल्याचे कळते. पोलीस भरतीतील अनेक उमेदवारांचाही त्यात सहभाग आहे. निवड झालेल्या होमगार्डला आगामी सणोत्सव व निवडणुकीत उमेदवारांना कर्तव्यावर नेमण्यात येईल.

रिक्त पदांचा तपशील
पथकाचे नाव रिक्त जागा
नाशिक शहर ४४ पुरुष, ११ महिला
इगतपुरी २५ पुरुष, ०५ महिला
सिन्नर २५ पुरुष, ०५ महिला
निफाड १५ पुरुष, ०० महिला

होमगार्ड पथक व पोलीस ठाणे (अंतर्गत)
नाशिक शहर पंचवटी, सरकारवाडा, म्हसरूळ, गंगापूर, भद्रकाली, सातपूर, मुंबईनाका, अंबड व इंदिरानगर, इगतपुरी इगतपुरी, वाडीव-हे, घोटी. सिन्नर – सिन्नर, एमआयडीसी सिन्नर, वावी. निफाड – निफाड, सायखेडा, लासलगाव.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या