पेठ l प्रतिनिधी Peth
पेठ तालुक्यात व हरसुलच्या काही भागांत महिना दोन महिन्यांच्या अंतराने होत असलेल्या भुगर्भिय हालचाली व होणारे आवाज यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दि.२१ रोजी पहाटे ५.१०मिनिटाने फणसपाडा,आसरबारी,कोपुर्ली,हरसुल पाटे,दोनवडे,भुवन,उम्रदपेठ,आडगाव,भायगांव,गावंदपाडा,तिर्डे ,आदी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचे नागरिकांतुन सांगण्यात येते. भुकंपाच्या या सौम्य धक्क्याने कुठलीही जिवीत अथवा इतर हानी झाली नसली तरीही सततच्या भुगर्भीय हलचालीमुळे नागरीक धास्तावले आहेत .दरम्यान या भुगर्भिय हालचालींची शासन स्तरावरून विशेष लक्ष देण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मेरी च्या भुकंप मापन केंद्राकडून मिळालेल्या माहिती नुसार केंद्रा पासून ३८ किमी क्षेत्रात सौम्य धक्क्याची नोंद झाली असून मागील महिन्यात असेच सौम्य धक्के जाणवल्याने त्याची भुगर्भीय पाहाणीसाठी सिनीयर जिओलॉजीस्ट यांनी पहाणी केली परंतु त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही
आशा गांगुर्डे तहसिलदार पेठ