Tuesday, March 25, 2025
Homeनगरदुधाचे खरेदी दर कमी झाल्याने दूध धंद्याला ‘उतरती कळा’

दुधाचे खरेदी दर कमी झाल्याने दूध धंद्याला ‘उतरती कळा’

दुधाचे खरेदी दर व विक्रीदरातील तफावत शंकास्पद असल्याचेे दूध उत्पादकांचे मत

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Deolali Pravara

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुध व्यवसाय गेल्या दोन अडीच वर्षांपासून मोडकळीस निघाला आहे.आता देखील विधानसभा निवडणूक होताच तीन रुपये प्रति लिटरने दूधाचे खरेदी दर कमी करण्यात आले आहेत. मात्र, विक्रीच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. खरेदी दर व विक्री दराच्या मधील मलाई कोणाच्या घशात जाते, असा सवाल दूध उत्पादक शेतकर्‍यांमधून उपस्थित होत आहे.

- Advertisement -

शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दूध व्यवसाय सुरु आहे. या व्यवस्यात खाजगीकरण झाल्यापासून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यात सुमारे आडीच लाख लिटर दूध उपलब्ध होते. यामध्ये शुध्द दूध किती आणि भेसळयुक्त दूध किती? हा देखील संशोधनाचा भाग आहे. आठवड्याला दुधाचे पेमेंट गरज पडल्यास दुधावर अ‍ॅडव्हान्स दूध डेअरी चालकाकडून मिळत असल्याने ग्रामीण भागात हा व्यवसाय पसरत गेला. आज प्रत्येक शेतकर्‍यांच्या व शेतमजुराच्या घरा समोर दोन-चार गायी हमखास दिसतात. साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी दुधाला 35 ते 40 रुपये लिटरचा दर मिळत होता. त्यामुळे दूध व्यवसायाला सुगीचे दिवस होते. दुधाला चांगला भाव असल्याने दुधाळ जनावरांना देखील चांगला भाव होता. चांगल्या गायींना एक लाख ते लाखाच्या पुढे किंमत मिळत होती.

त्यामुळे दुध व्यवसाया बरोबरच लहान कालवडी विकत घेऊन त्यांची मोठी गाय करून विक्री करण्याचा व्यवसाय देखील मोठ्याप्रमाणात केला जात होता. यामध्ये देखील चांगल्याप्रकारे नफा मिळत होता. 40 रुपये लिटर दुधाला भाव होता तेव्हा ही सरकी पेंड पोते 1700 रुपयांना होती आणि आज दूध 27 रुपये लिटर झाले तरी सरकी पेंड, कांडी, वालीस आदीसह पशुखाद्याच्या किमती मात्र कुठल्याही प्रकारे कमी झालेल्या नाहीत. पशुखाद्याच्या किमंती उतरल्या नाही. दुधाच्या उत्पादनात वाढ झाली नाही.सरकारने कुठले बदल केले नाही, मग अचानक एक, दोन नव्हे थेट 3 रुपये लिटरने दुधाचे दर कमी झालेच कसे? हा सवाल दूध उत्पादकांना पडला आहे. याबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, अद्याप तरी या बाबत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली दिसत नाही.

मग, जे मोठे दूध संघ आहेत.दूध प्लाँट आहेत, याच्यावर सरकारचा काही अंकुश आहे की नाही. दुधाचे दर वाढले तर विक्रीचे दर वाढतात. मग दुधाचे दर कमी झाल्यानंतर विक्रीचे दर का कमी होत नाही? हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. ही दुध मलई कोणाच्या घशात जाते? या मलई वर ताव मारणारे बोके कोण? याचा शोध सरकारने घेणे गरजेचे आहे. दूधाचे दर उतरल्याने अनेक शेतकर्‍यांनी जनावरांचे गोठे मोडले आहेत. दलालांनी जनावरांची खरेदीविक्री थांबवली आहे.दुधाचे दर उतरल्याने दुधाळ जनावरांचे भाव मातीमोल झाले आहेत. पूर्वी एक लाखाला विकली जाणारी गाय आज उधारीवर तीस ते चाळीस हजाराला विकत आहे.

एकीकडे पशुखाद्यासह चार्‍याचे वाढते दर, मजुरांचा प्रचंड असणारा तुटवडा तर दुसरीकडे दुधाचे सतत कोसळणारे दर यामुळे दूध उत्पादकांचे पुरते कंबरडे मोडले असून दुधाळ जनावरांच्या किमती मातीमोल झाल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. यातून सावरण्यासाठी सरकारने अनुदान जाहीर केले. परंतु ही योजना देखील कागदावरच राहीली. आज अनेक दूध उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांना तारणारा एकमेव व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जात होते, परंतु या व्यावसायाची देखील वाट लागल्याने आता शेती व्यवसाय पुरता मोडकळीस निघाला आहे. यातून सावरण्यासाठी सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन तातडीने दूध दरवाढ करावी तरच दूध उत्पादक व पशुधन टिकेल.

लंपीच्या आजारात मोठ्या संख्येने दुभती जनावर दगावली.अतिवृष्टीमुळे, पुर आल्याने अनेक जनावर मृत्युमुखी पडली. प्रचंड थंडी असल्याने जनावरांचे कमालीचे दुध घटले. तरी दुध वाढतेच कसे? दुध कमी का होत नाही? याचाच अर्थ दुधातील भेसळ बंद झालेली नाही. आणि ज्या दिवशी ही भेसळबंद होईल, त्यादिवशी शेतकर्‍यांच्या दुधाला समाधानकारक भाव मिळेल? मात्र, सरकारने भेसळ बंद करण्यासाठी कडक कारवाईची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...