Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमNashik Crime News: कडलग भोवती सात ते आठ एजंटचे जाळे; एक कोटींच्या...

Nashik Crime News: कडलग भोवती सात ते आठ एजंटचे जाळे; एक कोटींच्या व्यवहारानंतर SIT च्या रडारवर मोठी साखळी

नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या बहुचर्चित ‘व्हीआयपी दर्शन’ घोटाळ्याचा तपासात प्रकरणातील मुख्य संशयित आणि देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या बँक खात्यात एक कोटी १३ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळल्यानंतर, आता एसआयटीच्या हाती एजंटांची मोठी साखळी लागली आहे.

सात ते आठ एजंटांचे हे जाळे थेट कडलग यांच्याभोवतीच फिरत असल्साचे तपासात निष्पन्न झाले असून, हे सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यातील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. एसआयटी प्रमुख तथा त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात गंभीर माहिती समोर आली आहे. निष्पन्न झालेले सात ते आठ एजंट आणि संशयित कडलग यांच्यात केवळ फोनवरून संभाषण झाले नाही, तर त्यांचे आर्थिक व्यवहारही एकमेकांशी ‘कनेक्ट’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

Ashok Kharat Crime News: महिलेला दैवी कोपापासून वाचवण्यासाठी वर्षभर अत्याचार; अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

परराज्यातील भाविकांना गाठणे, त्यांच्याकडून जादा पैसे उकळणे आणि त्यातील वाटा ठराविक साखळीद्वारे फिरवणे, असा हा गोरखधंदा सुरू होता, असे समोर आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २०० हून अधिक भाविकांची चौकशी करण्यात आली आहे. अनेक भाविकांनी दर्शनासाठी एजंटला पैसे दिल्याची कबुली दिली असली, तरी प्रत्यक्षात अधिकृत तक्रार देण्यासाठी परराज्यातील आणि महाराष्ट्रातील भाविक पुढे येत नसल्याचे चित्र आहे, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी निसंकोचपणे तक्रार नोंदवावी. तक्रारदारांनी पुढाकार घेतल्यास न्यायालयात या गुन्ह्यातील दोषसिद्धी वाढवण्यास मोठी मदत होईल’, असे आवाहन एसआयटीने केले आहे.

बँक खात्यांचे स्कॅनिंग
फसवणुकीच्या रकमेतून संशयितांनी कोणती स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का? याचा शोध आता एसआयटी घेत आहे. कडलग यांच्या बँक खात्यांवरील व्यवहारांचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याने, पैशांचा हा ‘रूट’ शोधण्यासाठी बँकांकडून सविस्तर तपशील मागवण्यात आला आहे.

Nashik Crime News: सातपूरमध्ये दिवसाढवळ्या व्यावसायिक महिलेची पोत खेचली

आज पुन्हा सुनावणी
संशयित कडलग व गोटीराम पेहरे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने, त्यांना आज (दि. २४) पुन्हा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. एजंटांची साखळी पकडण्यासाठी आणि जप्त केलेल्या रजिस्टरमधील संशयास्पद नोंदींचा छडा लावण्यासाठी एसआयटी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. केवळ ४ दिवसांत ७१ जणांना ‘पाहुणे’ म्हणून दर्शन दिल्याचे पुरावे समोर आले असताना, आता या प्रकरणाचे धागेदोरे कुठे पोहोचले आहेत, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

0
सप्तश्रृंग गड| प्रतिनिधी | Saptashrung Gadh श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Saptashrungi Gadh Darshan) आलेल्या ब्राह्मणवेल ता. साक्री येथील तरुणाने (Youth) शीतकड्यावरुन खोल दरीत उडी घेऊन...