Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshish Shelar : "सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव"; मंत्री आशिष शेलारांची...

Ashish Shelar : “सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव”; मंत्री आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा

मुंबई | Mumbai

राज्य सरकारने (State Government) १०० वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Minister Aashish Shelar) यांनी विधानसभेत (Vidhansabha) केली.

- Advertisement -

यावेळी विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “महाराष्ट्रात (Maharashtra) सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच आज चालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव (Ganeshotsav) आहे. देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सव बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात (Court) जरूर केला. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की हे महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना, आलेल्या स्पिड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम अतिशय शीघ्रतेने केले” असेही मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “पीओपीच्या (Pop) परंपरागत मूर्तींवर बंदी आणताना सीपीसीबीच्या गाइडलाइन्सचा तत्कालीन सरकारच्या काळातल्या सरकारने बाऊ केला गेला. त्यानंतर पीओपी मूर्तींबाबतीमध्ये पर्यावरणपूरक अन्य पर्यायांना समोर ठेवून, पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही, या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका आमच्या विभागाने घेतली. राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत काकोडकर समितीचा अहवाल घेतला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मूर्ती बनवणे, डिस्प्ले करणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाली”, असेही आशिष शेलारांनी सांगितले.

ताज्या बातम्या

विधान

MLC BJP Candidate List: विधान परिषदेसाठी भाजपचे धक्कातंत्र; ३० उमेदवारांची यादी...

0
मुंबई | Mumbaiआगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ३० जणांची नावे निवडण्यात आली. ही यादी दिल्लीत पाठवण्यात आली...