Wednesday, April 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChandrakant Patil: अजित पवारांना निवडणुकीत शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची जमीन प्रकरणाची खेळी? मंत्री...

Chandrakant Patil: अजित पवारांना निवडणुकीत शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची जमीन प्रकरणाची खेळी? मंत्री चंद्रकांत पाटील खुलासा, म्हणाले…

पुणे | Pune
पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे सांगत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे. तर, कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच, मुख्यमंत्र्यांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणाची खेळी खेळली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जमीन व्यवहार प्रकरणाची खेळी खेळली असल्याचे समाज माध्यमांवर कयास बांधला जात आहे. आता या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले?
मंत्री पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसते, त्यामुळे मीडियाने हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खेळली मोठी खेळी… पण, असे काही नाही, रूटीनमध्ये एखादा विषय समोर येतो. त्याची पण चौकशी व्हायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत, त्यांनी तातडीने तहसीलदाराला निलंबित केले, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुढे चंद्रकांत पाटील असे ही म्हणाले, मोठे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. फौजदारी दावा कोणा कोणावर करायचा त्याबाबत यादी झाली आहे, त्या वेगाने तपास पुढे चालला आहे. त्यामुळे आपण आत्ताच पार्थ पवारांची जबाबदारी आहे की, त्यांच्या कंपनीची आहे. हे सगळे चौकशीअंती बाहेर येईल, त्या सगळ्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काहीही कसलाही संबंध नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : १ एप्रिल २०२६ – संघर्षाकडून शांततेकडे…

0
भारतीय लोकशाहीच्या प्रवासात अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वात भीषण, क्रूर आणि रक्तपाती आव्हान म्हणून ओळखला जाणारा नक्षलवाद आता अंताच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकेकाळी पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत पसरलेला...