Sunday, April 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune Land Scam: पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाहीच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,...

Pune Land Scam: पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाहीच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजून कोणताही अहवाल…”

मुंबई | Mumbai
पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लिनचीट देण्यात येणार आल्याच्या बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. पुढच्या आठवड्यात विकास खारगे समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. या व्यवहारात नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने पार्थ पवार यांची निर्दोष मुक्तता होणार, अशी चर्चा होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, पार्थ पवार यांना मुंढवा प्रकरणात कोणतीही क्लीन चीट अद्याप देण्यात आलेली नाही. अशाप्रकारच्या चर्चा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावल्या आहे.

असा अहवाल सरकारकडे आला नाही
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “अजून कोणताही अहवाल हा राज्य सरकारकडे आलेला नाही. याउलट खारगे समितीने ८ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. आतापर्यंत अहवालच सरकारकडे आलेला नाही. त्यामुळे, अशाप्रकारच्या बातम्या कशा येतात? लोकांना गोंधळात टाकतात.” असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “माध्यमांना माझी विनंती आहे की, अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा बातम्या देऊन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये.” असेही ते पुढे म्हणाले आहेत. खारगे समितीचा अहवाल पुढच्या ८ दिवसांत सरकारकडे येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

Pune Land Scam: मोठी बातमी! मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लिन चीट, अहवालात नेमके काय म्हंटले?

अंजली दमानिया काय म्हणाल्या?
पार्थ पवारचं नाव चार्जशीटमध्ये नाही असे होऊच शकत नाही. ती चार्जशीट ही शीतल तेजवानीला जामीन मिळू नये यासाठी होती. मी एक पूर्ण प्रिंटआऊट काढले आहे. पार्थ पवार यांनी पॉवर ऑफ अटर्नी शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात हा झाला होता. याच्यात प्रत्येक पानावर त्यांचे नाव आहे. इतकेच नाही तर पार्थ पवारचा फोटो, शिक्का त्यावर त्यांची सही खाली विटनेसची सही आहे.’

‘याच जमिनीचा व्यवहार हा पार्थ पवार यांनी शीतल तेजवानी सोबत केला होता. याची कॉपी मी खारगे समितीला दिली आहे. त्यामुळं खारगे समिती त्यांना याच्यातून क्लीन चीट देऊच शकत नाही आणि जर त्यांनी पार्थ पवार यांना बाहेर काढलं, तर मी खारगे समितीला धारेवर धरणार आहे. मी उच्च न्यायालयापर्यंत लढा देणार.’

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...