Tuesday, April 28, 2026
Homeनाशिकओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन; बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावल्याचे...

ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन; बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावल्याचे म्हणत मंत्री भुजबळांकडून शोक व्यक्त

मुंबई | Mumbai

ऑल इंडिया ओबीसी (OBC) संघटनेचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज (रविवारी) जालना (Jalna) येथील राहत्या घरी दुपारी साडेबाराच्या सुमारास वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनावर ओबीसी नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात असून, ओबीसी चळवळीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी अन्सारी यांच्या निधनानंतर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

मंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले की, शब्बीर अन्सारी (Shabbir Ansari) केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे. शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.

‘मंडलनामा’ या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या हक्कासाठी सदैव प्रेरणा देत राहील. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे. अन्सारी साहेबांनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला लढा हा केवळ मुस्लिमांसाठी नसून तो संपूर्ण वंचित घटकांसाठी होता.

स्व. विलासराव देशमुख, शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांच्यापासून ते युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढला. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. एक सच्चा आणि लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अन्सारी परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे त्यांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचे निधन दुःखदायी आहे. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीतील एक झुंजार आणि निष्ठावान नेतृत्व हरपले आहे. ओबीसींच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणारे शब्बीर अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अन्सारी परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

माजी खासदार समीर भुजबळ

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...