Friday, May 8, 2026
Homeमुख्य बातम्याChhagan Bhujbal : सुप्रिया सुळेंनी म्हटलं, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; मग...

Chhagan Bhujbal : सुप्रिया सुळेंनी म्हटलं, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं; मग भुजबळांनी एका वाक्यात विषयच संपवला

नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी येथील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे?” असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांकडून सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी येवला येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुळे यांनी केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “कुणी काय खावं याच्याकडे जास्त लक्ष देण्याचे गरज नाही, असे म्हणत भुजबळांनी थेट विषयच संपवला. दुसरीकडे सुळे यांच्या या वक्तव्याचा आळंदीचे ह.भ.प.बाळासाहेब महाराज खरात यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकलं नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार आहे. त्यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा खरात यांनी दिला.

तुषार भोसलेंचीही सुळे यांच्यावर टीका

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करुन शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण, मौलाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा खोचक टोला भोसले यांनी सुळेंना लगावला होता.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “मी रामकृष्ण हरी वाली आहे. फक्त माळ घालत नाही, कधी कधी मटण खाते, खरं बोलते, मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, त्यात कोणाचे काही जाणार नाही. मी मटण खातो तर काय पाप केले आहे का? माझ्या पांडुरंगाला ते मान्य आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे?” असे त्यांनी म्हटले होते.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...