Thursday, May 2, 2024
Homeधुळेमंत्री छगनराव भुजबळ 25 ला धुळे जिल्हा दौर्‍यावर

मंत्री छगनराव भुजबळ 25 ला धुळे जिल्हा दौर्‍यावर

निजामपूर Nizampur । प्रतिनिधी

अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ (Minister Chhaganrao Bhujbal) हे दोन दिवसीय धुळे जिल्हा दौर्‍यावर (tour of Dhule district) येत आहेत. दि.25, 26 सप्टेंबर रोजी ना.भुजबळ धुळ्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

त्यांच्या नियोजित दौर्‍यात दि.25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर व जिल्हा बैठक. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक सायंकाळी 6वा. होईल. त्यानंतर रात्री सर्किट हाऊस येथे त्यांचा मुक्काम असेल. दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक त्यानंतर सकाळी 10 वा. स्टेशन रोडवरील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतील असे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, जिल्हा सचिव बापू महाजन यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या