Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik Political : ॲड. राहुल ढिकले यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली; माझा...

Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली; माझा आशीर्वाद आमदार ढिकलेंना

मंत्री गिरीश महाजन यांचा बंडखोरांना पाडण्याचा संदेश

पंचवटी | प्रतिनिधी
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. ते कायम जनतेच्या संपकांत असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. माझा आशीर्वाददेखील आमदार ढिकले यांनाच आहे. भ्रष्टाचार करणा-यांनी माझ्या नावाचा वापर करू नये, भविष्यात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

निमाणी येथे ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर, सह संपर्कप्रमुख राजू अण्णा लवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, रंजना भानसी, अरुण पचार, जगदीश पाटील, गणेश उनवणे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हे ही वाचा: निफाडचा सुवर्णकाळ गुरुदेव कांदे परत आणणार : दत्तू बोडके

महायुतीने लोकाभिमुख योजना राचवल्यामुळे राज्यात पुन्हा सरकार स्थापन होणार आहे. लाडकी बहीण तसेच अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्यामुळे जनतेकडून महायुती सरकारला पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे महाजन यांनी सांगितले.

बांडीवालाची बंडलाची भाषा
उद्धव निमसे यांनी नेहमीच्या धडाकेबाज शैलीत टीका करताना, असे म्हटले की, उसाची बांडी घेणारा आज नोटांच्या बंडलाच्या जोरावर जनतेला विकत घेण्याची भाषा करत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर येत आहे. हा पैसा लुटून घ्या. मात्र, जनतेच्या सेवेत असणाऱ्या प्रामाणिक आमदार ढिकले यांना सर्व शक्तीनिशी मतदान करून विधानसभेत पाठवा. विजय करंजकर यांनी म्हटले की, प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैशाची हवा केली जात आहे त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, २०१७ मध्ये चुकीच्या उमेदवाराला नगरसेवकपदासाठी संधी दिली. मात्र आता ढिकले यांना मोठे मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी आमदार सानप यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या