Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमंत्री नरहरी झिरवाळ यांची दूध बाजार परिसरात अचानक भेट; दुग्धजन्य पदार्थांची केली...

मंत्री नरहरी झिरवाळ यांची दूध बाजार परिसरात अचानक भेट; दुग्धजन्य पदार्थांची केली तपासणी

ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी सकाळी जुन्या नाशिकमधील प्रसिद्ध दूध बाजार परिसराला अचानक भेट देत दूध, खवा तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि भेसळखोरांवर प्रभावी आळा बसावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

यावेळी दूध विक्रेते व व्यापाऱ्यांकडील विविध पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत दूध, खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नसल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दुधातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक तपासण्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मंत्री झिरवाळ स्वतः मैदानात उतरल्याने दूध बाजार परिसरात व्यापारी तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या अचानक पाहणीमधून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

क्रीडापटूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाबाबत सुसूत्रता तसेच एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यास मंगळवारी...