Monday, June 22, 2026
Homeक्राईमRahuri : येवले आखाडा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

Rahuri : येवले आखाडा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीतील येवले आखाडा येथील एका अल्पवयीन मुलाचे राहत्या घरातून 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर हौशिनाथ शेटे रा. येवले आखाडा, राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांची पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

त्यावेळी त्यांचा भाऊ गोरक्षनाथ शेटे, पुतण्या तुषार हे घरीच होते. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेटे हे शेतातील पाणी धरुन घरी जेवणासाठी आले. त्यावेळी त्यांना पुतण्या तुषार घरी दिसला नाही. तेंव्हा भाऊ गोरक्षनाथ शेटे यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही दोघांनी सकाळी 11 वाजता जेवण केले त्यानंतर ते झोपी गेले. असे सांगितल्याने त्यांनी तुषारचा घराचे आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांसाठी पुतण्या तुषार याचे अपहरण केले आहे, अशी त्यांची खात्री झाली.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गु.र.न. 882/2025 नुसार भारतीय न्याय दंड संहिता 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार गोरक्षनाथ शेटे (वय 16 वर्षे) रा. येवले आखाडा ता. राहुरी असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून त्याचा रंग-गोरा, उंची 5 फुट, केस काळे बारीक, अंगात पिवळा फुल बाह्यांचा शर्ट व फिकट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात चप्पल, डाव्या हाताचे कांबीवर ‘जय श्री राम’ असे गोंदलेले असे वर्णन आहे. तरी वरील वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास राहुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB Police) मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील हरेगाव (Haregaon) रोडवरील एस कॉर्नर...